Ad will apear here
Next
‘टाटा पॉवर’ आणि ‘महानगर गॅस’ यांच्यात सामंजस्य करार
नवी दिल्ली : ‘टाटा पॉवर’ या एकात्मिक वीज कंपनी आणि अग्रगण्य गॅस वितरण कंपन्यांपैकी एक असलेल्या महानगर गॅस लिमिटेड (एमजीएल) यांनी सामंजस्य ठरावावर स्वाक्षऱ्या केल्या. एकात्मिक ग्राहकसेवांतील ऑपरेशन्समध्ये समन्वयाच्या शक्यता तपासून बघणे, उदयोन्मुख ई-वाहतूक व्यवसायात प्रवेश करणे आणि सामाईक हिताच्या अन्य काही मूल्यवर्धित हिताच्या बाबी डोळ्यापुढे ठेवून हा सामंजस्य ठराव करण्यात आला आहे.

‘एमजीएल’चे व्यवस्थापकीय संचालक संजीब दत्ता आणि ‘टाटा पॉवर’चे मुंबईतील मुख्य कार्यकारी अधिकारी आणि व्यवस्थापकीय संचालक प्रवीर सिन्हा यांनी या करारावर स्वाक्षऱ्या केल्या. या करारामुळे कॉमन युटीलिटी रेव्हेन्यू सायकल मॅनेजमेंट व कस्टमर मॅनेजमेंट सोल्युशन्स, आयटी सोल्युशन्स, डेटा अॅनालिटिक्स, जिओग्राफिकल इन्फॉर्मेशन सिस्टमवर  (जीआयएस) आधारित सोल्युशन ‘एससीएडीए’ प्रणाली यांच्यात सहकार्याच्या शक्यता तपासून बघणे शक्य होणार आहे. त्याचप्रमाणे भूमिगत मालमत्ता सुरक्षित ठेवण्यासाठी उपक्रम, सोलार रूफटॉप उपक्रम आणि इलेक्ट्रिक वाहनांसाठी संबंधित वीज व्यवस्थापन उपायांसोबतच व्यावसायिक स्तरावर चार्जिंग किंवा बॅटरी स्वॅपिंग स्टेशन्स स्थापन करण्‍यासाठी सहकार्य करण्याचा समावेशही यात आहे.

‘टाटा पॉवर’चे मुख्य कार्यकारी अधिकारी आणि व्यवस्थापकीय संचालक सिन्हा म्हणाले, ‘‘एमजीएल’सोबत भागीदारीची घोषणा करताना आम्हाला आनंद होत आहे. भारतातील वीजग्राहकांना विस्तृत सेवा देण्यासाठी टाकलेले हे आणखी एक महत्त्वाचे पाऊल आहे. विशेषत: ग्राहक व्यवस्थापन धोरण, आयटी सोल्युशन्स, डेटा अॅनालिसिस, ‘जीआयएस’वर आधारित ‘एससीएडीए’ प्रणालींसाठी ही भागीदारी उपयुक्त ठरेल. त्याचप्रमाणे भूमिगत मालमत्ता सुरक्षित ठेवण्यासाठी एकत्रितपणे उपक्रम राबवणे, सोलार रूफटॉप उपक्रम आणि भारतात भविष्यकाळात लोकांच्या तसेच मालाच्या वाहतुकीसाठी महत्त्व प्राप्त होण्याची शक्यता असलेल्या ई-वाहतूक या क्षेत्रांतही भागीदारी महत्त्वपूर्ण ठरेल.’ 

‘एमजीएल’चे व्यवस्थापकीय संचालक दत्ता म्हणाले, ‘मुंबई आणि आजूबाजूच्या परिसरात पर्यावरणपूरक सीएनजी आणि पीएनजी पुरवण्याचे काम ‘एमजीएल’ने सुरू केले, त्याला आता २५ वर्षे पूर्ण होतील. या टप्प्यावर आम्ही गॅसपलीकडील काही व्यावसायिक संधी चोखाळून बघत आहोत. भारतातील वाहतूक व्यवसायात नव्याने उदय होत असलेल्या ई-वाहतूक विभागात प्रवेश करण्याच्या, तसेच समन्वयाच्या शक्यता पडताळून बघण्याची संधी आम्हाला ‘टाटा पॉवर’सोबत झालेल्या या भागीदारीच्या माध्यमातून मिळाली आहे.’
 
Feel free to share this article: https://www.bytesofindia.com/P/KZSFCA
Similar Posts
‘टाटा पॉवर’तर्फे ओडिशातील वादळग्रस्तांना मदत नवी दिल्ली : ओडिशामध्ये नुकत्याच आलेल्या फनी वादळामुळे संपूर्ण राज्यभरात नुकसान झाले. या वादळानंतर आता ओडिशातील सुमारे १० दशलक्ष नागरिकांची अनियमित वीज पुरवठ्यामुळे गैरसोय होत आहे. भुवनेश्वरसह बहुतांश किनारपट्टीभागातील सुमारे एक लाख वीजेचे खांब उन्मळून पडले असून, अनेक सबस्टेशन आणि लो ट्रान्समिशन लाइन्स पूर्णपणे बंद पडल्या आहेत
‘क्लब एनर्जी’तर्फे जल संवर्धनावरील नवीन मॉड्युल नवी दिल्ली : ‘क्लब एनर्जी’ या भारताच्या भावी पिढीला प्रशिक्षण देणे, तसेच त्यांना संवेदनशील बनवणे या उद्देशाने सुरू केलेल्या ‘टाटा पॉवर’च्या राष्ट्रीय पातळीवरील उपक्रमाच्या माध्यमातून ‘जल संवर्धन’ (वॉटर कन्झर्व्हेशन) या विषयावर नवे मॉड्युल सादर केल्याची घोषणा केली आहे.
‘क्लब एनर्जी’तर्फे वीज बचतीविषयी जनजागृती नवी दिल्ली : ‘क्लब एनर्जी’ ही टाटा पॉवरची राष्ट्रव्यापी संसाधन आणि ऊर्जा संवर्धन चळवळ देशभरात राष्ट्रबांधणीवर धोरणात्मक भर देऊन संसाधनांच्या संवर्धनाबद्दल जागरूकता निर्माण करण्याचे काम करत आहे. हाच वेग कायम राखत, क्लब एनर्जीने मुंबई, नवी दिल्ली, अहमदाबाद, कोलकाता, पुणे आणि बेंगळुरू या सहा शहरांतील ३
‘टीपीसीडीटी’ने हजाराहून अधिक तरुणांना केले सबल पुणे : ग्रामीण भागातील तरुणांची कौशल्य वाढवण्यासाठी व त्यांना उद्योगांमध्ये व बाजारात रोजगार मिळण्यासाठी टाटा पॉवर कम्युनिटी डेव्हलपमेंट ट्रस्टतर्फे (टीपीसीडीटी) मावळ व भिवपुरी येथे ‘एम्प्लॉएबिलिटी– कौशल विकास प्रोग्रॅम’ सुरू केला आहे. हा कार्यक्रम सुरू झाल्यापासून तीन वर्षांमध्ये, एक हजार १७० तरुणांना

Is something wrong?
ठिकाण निवडा
किंवा

Select Feeds (Section / Topic / City / Area / Author etc.)
+
ही लिंक शेअर करा
व्यक्ती आणि वल्ली स्त्री-शक्ती कलाकारी दिनमणी
Select Language